Chandrapur police destroy narcotics worth ₹66.14 lakh seized in 51 cases.
चंद्रपूर :- अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करत चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 51 गुन्ह्यांमधील एकूण 66 लाख 14 हजार 886 रुपयांचा अमली पदार्थ नियमानुसार नष्ट केला. मा. जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हास्तरीय अमली पदार्थ नाश समितीची परवानगी घेत ही कारवाई करण्यात आली. Chandrapur police destroy narcotics
या कारवाईत 310 किलो 340 ग्रॅम गांजा (किंमत ₹53,02,486), 420 ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत ₹13,05,000) तसेच 76 ग्रॅम गर्द (किंमत ₹7,400) असा एकूण ₹66,14,886 किमतीचा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ शासकीय वाहनातून नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या प्रकल्पात सुरक्षितरीत्या नेण्यात आला. तेथे अत्याधुनिक बॉयलर प्रणालीद्वारे पर्यावरणपूरक पद्धतीने तो पूर्णतः जाळून नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व प्रभारी गृह उपअधीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात
त्यावेळी नोडल अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस अंमलदार स.पो. फौ. अरुण खारकर, पो.हवा. सुधीर मत्ते, पो.कॉ. किशोर वकाटे, पो.कॉ. प्रदीप मडावी, पो.कॉ. अमोल साबे, फोटोग्राफर पो. कॉ. वैभव पत्तीवार, चालक पो.हवा. प्रमोद डोंगरे, पो.कॉ. रूपेश बारशिंगे तसेच पो.कॉ. शुभम बल्की यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, समाजात अमली पदार्थांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी अशा प्रभावी उपाययोजना भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.