Friday, May 29, 2026
HomeBudgetइंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार

Congress Launches Massive Protest Against Fuel Price Hikes and Inflation

इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार ; राजुरात भव्य जनआंदोलन संपन्न.

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती मुर्मु यांना विविध मागण्यांचे निवेदन.

चंद्रपूर :- पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी राजुरा येथे भव्य जनआंदोलन करण्यात आले. शिवा (देशपांडे) पेट्रोल पंप परिसरात आयोजित या आंदोलनात काँग्रेसच्या विविध फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. Protest Against Fuel Price Hikes and Inflation

वाढत्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जनतेचे जीवनमान खालावत चालल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात हे जन आंदोलन पार पडले.

यावेळी उपस्थित नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, जोरदार घोषणाबाजी करीत उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. इंधन दरवाढ तात्काळ कमी करावी, घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणाव्यात तसेच वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष रंजनभाऊ लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, अँड. अरूणभाऊ धोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सेवादल तालुकाध्यक्ष भाष्कर वाटेकर, भटक्या-विमुक्त जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सभापती तिरुपती इंदूरवार, ओबीसी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पावडे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष अस्लम चाऊस, माजी सभापती विकास देवाळकर, अँड. रामभाऊ देवईकर, न प सभापती अनंतकुमार ताजने, सभापती पूनम गिरसावडे, नगरसेवक एजाज अहमद, इंदुबाई निकोडे, कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, धनराज चिंचोलकर, भुषण बानकर, रामभाऊ ढुमणे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अरूण लांडे, अजय बतकमवार, अभिजीत धोटे, सुधाकर उईके, मनोहर बोबडे, पंढरी चन्ने, सय्यद साबिर, आकाश मावलीकर, संघपाल देठे, निरंजन मंडल, अनंत एकडे, देवानंद चांदूरकर, अनिल आलाम, प्रणय लांडे, चेतन जयपूरकर, मधुकर झाडे, सय्यद शाकीर, कुणाल मोकळे, संदीप नन्नवरे, श्रीधर रावला, प्रवीण चिडे, रवी करमनकर, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच काँग्रेसच्या विविध सेल व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular