Conveying a Message of Fuel Conservation, Hansraj Ahir Travels by Vande Bharat Express
चंद्रपूर :- पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष Hansraj Ahir यांनी स्वतः पुढाकार घेत सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने प्रवास केला.
आरोग्यसेवा हिच खरी लोकसेवा………
दि. १७ मे २०२६ रोजी हंसराज अहीर यांनी चंद्रपूर ते हैदराबाद आणि परतीचा हैदराबाद ते चंद्रपूर असा प्रवास खाजगी वाहनाऐवजी वंदे भारत एक्सप्रेसने पूर्ण केला. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षित प्रवास या तिन्ही बाबींना प्राधान्य देत त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक संदेश ठेवला. फुले दाम्पत्यांना भारतरत्न द्या, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा……….
यावेळी बोलताना हंसराज अहीर म्हणाले की, “देशहित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने इंधन बचतीचा छोटासा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. खाजगी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा वापर होतो. त्याचबरोबर प्रदूषण आणि अपघातांचा धोकाही वाढतो. वंदे भारतसारख्या आधुनिक, आरामदायी आणि वेगवान रेल्वे सेवांचा वापर केल्यास वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होण्यास मदत होते.”
अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात चंद्रपुरात धरणे आंदोलन………
देशात वाढत्या इंधन वापराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक आणि रेल्वेचा अधिकाधिक वापर केल्यास देशावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हंसराज अहीर यांच्या या उपक्रमामुळे इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, नागरिकांनीही सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
