Tuesday, April 28, 2026
HomeNationalबल्लारशाह - मुंबई व बल्लारशाह - पुणे नवीन साप्ताहिक रेल्वे लवकरच धावणार

बल्लारशाह – मुंबई व बल्लारशाह – पुणे नवीन साप्ताहिक रेल्वे लवकरच धावणार

New Weekly Trains — Ballarshah–Mumbai and Ballarshah –Pune — to Start Running Soon:

चंद्रपूर :- दि.  23 एप्रिल 2026 रोजी हंसराज अहीर यांनी मुंबई येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रेल्वे संबंधित मुद्द्यांवर सविस्तार चर्चा केली. या बैठकीत बल्लारशाह-मुंबई आणि बल्लारशाह-पुणे दरम्यान नवी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत प्रमुख चर्चा झाली. या बैठकीत चंद्रपूर  रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री (मध्य रेलवे ZRUCC सदस्य) उपस्थित होते.

या चर्चेनंतर  रेल्वे विभागाने हंसराज अहीर यांना पत्र पाठवून ट्रेन क्रमांक 20105/20106 (LTT-BPQ-LTT) ही गाडी 8 ते 10 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.  दिनांक 22 एप्रिल रोजी हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेत या सर्व मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती.

सदर बैठकीत महाव्यवस्थापक यांनी बल्लारशाह-पुणे दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक गाडी लवकरच सुरू करण्याचे आश्वासनही दिले आहे.

याशिवायहंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने आणखी दोन महत्त्वाच्या ट्रेनमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला लाभ मिळणार आहे 

ट्रेन क्र. 08261/08262 (कोरबा-येलेनका) ही स्पेशल ट्रेन आता नियमित करण्यात येणार असून 18261/18262 या क्रमांकाने धावणार असून चांदा फोर्ट येथे थांबा देण्यात येणार आहे. ही गाडी दर शनिवारी संध्याकाळी 19.45 वाजता चांदा फोर्टला पोहोचेल. तर चेन्नई-कोरबा ही परतीची गाडी दर सोमवारी रात्री 20:52 वाजता चांदा फोर्ट येथे थांबेल.

ट्रेन क्र. 20625/20626 (चेन्नई-भगत की कोठी-चेन्नई) ही ट्रेन नियमितपणे सुरू होणार असूनचंद्रपूर स्टेशनला थांबा देण्यात येणार आहे.

या सर्व नवीन सुविधांमुळे चंद्रपूरबल्लारशाहचांदा फोर्टसह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईपुणेचेन्नईकोरबा आदी प्रमुख शहरांशी थेट आणि सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.

हंसराज अहीर यांनी या सर्व मुद्द्यांवर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल चंद्रपूर  रेल्वे प्रवासी सेवा संस्थास्थानिक प्रवासी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular