Social Safety Awareness Program on behalf of Dhariwal Infrastructure Limited on the occasion of National Safety Week
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड Dhariwal Infrastructure Limited हा वीजनिर्मिती व वितरण प्रकल्प आपल्या विविधांगी सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून विशिष्ट कार्य करण्याची ओळख धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ने निर्माण केली आहे. या सकारात्मक विचारधारेतून सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून उद्योगाच्या सुरक्षा विभाग, वीज विभाग आणि सीएसआर विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय सुरक्षा आठवड्याचे औचित्य साधून ग्राम येरुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत National Safety Week सामाजिक जागरूकता आणि वैयक्तिक सुरक्षा कार्यक्रम आयोजित केला गेला. Social Safety Awareness Program
प्लांट हेड देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनात संपन्न या कार्यक्रमात सुरक्षा विभागाचे प्रफुल्ल वैद्य, वीज विभागाचे मनीष ठाकरे, सीएसआर विभाग प्रमुख डॉ. अनिष नायर, उपव्यवस्थापक प्रतीक वानखेडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम, अन्य शिक्षक वृंद, गांव समिती व विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य सुरक्षा, शरीर सुरक्षा आणि धोके, घरी घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती दिली. अग्निशामक यंत्रांचे थेट प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आले. सामाजिक सुरक्षा जागरूकता करणाऱ्या धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या या स्तुत्य उप्रक्रमासाठी गाव समिती सदस्य आणि मुख्याध्यापकांनी आभार व्यक्त करीत उद्योगाच्या जागरूकता प्रयत्नांचे आणि मोहिमेचे कौतुक केले.