Monday, May 25, 2026
HomeSocialजेसीआय चंद्रपूर पावरसिटीचा स्थापना समारंभ उत्साहात

जेसीआय चंद्रपूर पावरसिटीचा स्थापना समारंभ उत्साहात

JCI Chandrapur Power City’s foundation ceremony is abuzz with excitement

चंद्रपूर  :- जेसीआय चंद्रपूर पावरसिटी JCI Chandrapur Powercity चा स्थापना समारंभ उत्साहात व भव्य वातावरणात पार पडला. नव्या कार्यकारिणीच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली.

जनगणना 2027 मध्ये शिक्षकांना सहभागी करू नये

या वेळी सोनम कपूर यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांना माजी अध्यक्ष पंकज नागरकर व माजी फर्स्ट लेडी तनिका नागरकर यांच्या हस्ते कॉलर व गॅव्हल प्रदान करण्यात आले. प्रवीण रायपुरे यांनी सचिवपदाची शपथ घेतली. स्थानिक संघटनेच्या गव्हर्निंग बोर्डच्या नव्याने नियुक्त सदस्यांनीही पदभार स्वीकारला. JCI Chandrapur Power City’s foundation ceremony

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अविनाश पोईंकर, विशेष अतिथी सौरभ गट्टानी तसेच विशेष उपस्थिती म्हणून स्मृती व्यावहारे उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

विधी सेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवा…

शपथ घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोषाध्यक्ष सूरज गुंडावार, संयुक्त सचिव प्रीती बल्लावार, व्यवस्थापन उपाध्यक्ष गणेश बेट्टावार, प्रशिक्षण उपाध्यक्ष अमोल बल्लावार आणि जनसंपर्क व विपणन उपाध्यक्ष वेदांत चापले यांचा समावेश होता. संचालक म्हणून व्यवस्थापन – सुहानी पोईंकर, सामुदायिक विकास – रश्मी पित्तुलवार, प्रशिक्षण – ऋचा भांबरी, जे-कॉम अध्यक्ष – आकाशदीप, सल्लागार मंडळ सदस्य – अमीत पोरेड्डीवार, प्रकल्प संचालक – नागेश उमाले व कविता चापले यांनीही शपथ घेतली.

कार्यक्रमाला अजय कपूर, अनुपा भांबरी, क्षमा पोरेड्डीवार, सचिन पित्तुलवार, श्री दिलीप व श्रीमती सीमा घोडसलवार, योगिता गुंडावार, काजल रायपुरे, शीतल उमाले, गणेश चतुरकर, ज्ञानेश कंचरलावार, रूपेश राठी, भावेश चौहान, अरविंद सोनी, शिवम मुंधडा, काजल कुकरेजा, जय येरोजवार आणि साक्षी बेट्टावर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सौरभ कपूर व अनिकेत गज्जेवार यांनी नवीन सदस्य म्हणून शपथ घेतली.

स्वीकृती भाषणात अध्यक्ष सोनम कपूर यांनी युवकांमध्ये कौशल्य विकास व नेतृत्व गुणांना चालना देण्याचा आपला संकल्प व्यक्त केला. “युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमात Chhatrapati Shivaji Maharaj जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख वक्त्यांनी शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी व प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण देत युवकांना प्रेरित केले. अविनाश पोईंकर यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा विशेष उल्लेख केला.

जेसीआय चंद्रपूर पावरसिटी ही युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular