3 house burglaries uncovered in Ramnagar area; ‘shooter’ on record arrested
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर LCB यांनी रेकॉर्डवरील घरफोड्या करणारा आरोपी सरफरोज उर्फ ‘शुटर’ याला अटक करून त्याच्या साथीदारासह रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून एकूण २१ लाख १९ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील घरफोडी प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. shooter on record arrested
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी चंद्रपूर शहरात घरफोडी, मोटारसायकल चोरी, जुगार व इतर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सरकारी वाहनाने शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी मो. सरफरोज सगीर शहा (वय २५ वर्ष), रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर याने पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर हद्दीतील इंदिरानगर परिसरात घरफोडी केली आहे. 3 house burglaries uncovered in Ramnagar
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याचा साथीदार सद्दाम मुस्ताक शेख (वय ३० वर्ष), रा. बँक ऑफ इंडिया मागे, घुग्घुस, चंद्रपूर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर, कृष्णानगर आणि शामनगर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. Chandrapur Local Crime Branch
आरोपींनी बंद घरे हेरून रात्रीच्या वेळी घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि त्याठिकाणी ठेवलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला एकूण २१,१९,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, सरफरोज उर्फ ‘शुटर’ हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, सुनिल गौरकार, तसेच पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, विजयमाला वाघमारे, निराशा तितरे, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार तसेच सायबर शाखेचे अनिमेश भोंगडे, भिरू यादव व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.