Bandu Gaurkar appointed as member of Maharashtra State Agricultural Prices Commission
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी बंडू गौरकार यांची नियुक्ती
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाने शेतकरी हितासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले, कृषी विषयातील जाणकार आणि जनआंदोलनातून घडलेले कार्यकर्ते बंडू गौरकार यांची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास संपादन करून झाली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी नवे आयाम निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बंडू गौरकार यांनी पूर्वी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा म्हणून जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे. तसेच त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी कार्य करताना ग्राहक आणि शेतकरी यांच्या हक्कांसाठी सक्रिय भूमिका निभावली आहे.
त्यांनी पीक विमा योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी, तसेच अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने लढा दिला आहे.
बंडू गौरकार यांचे ठाम मत आहे
“शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
या प्रसंगी बंडू गौरकार म्हणाले
“शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी मी मनापासून पार पाडणार आहे.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक निर्णयात त्यांच्या आवाजाला प्राधान्य मिळावे, हेच माझे ध्येय आहे.”
गौरकार यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून, शेतकरी वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



