Wednesday, November 5, 2025
HomeHealthचंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 22 डिसेंबर रोजी

चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 22 डिसेंबर रोजी

Chandrapur Cancer Hospital inauguration ceremony

चंद्रपूर :- राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे Chandrapur Cancer Hospital लोकार्पण 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.

अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली. “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय. Chandrapur Cancer Hospital inauguration ceremony

2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे.

या कॅन्सर हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री :यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट,
२ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators), ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग :यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा : सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे.
या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे.

या प्रकल्पाबाबत आ. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांची टाटा समूहाचे प्रमुख स्व. रतनजी टाटा Late Ratan Tata यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सर संघचालक मोहनजी भागवत Mohan Bhagwat यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी मोहनजी भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी 22 डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. आरोग्य सेवेचे नवे मानदंड जिल्ह्यात निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेले हे कॅन्सर रुग्णालय रुग्णसेवेचे प्रशस्त दालन ठरणार आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular