‘Chhath Puja’ festival celebrated with enthusiasm on the banks of Ramala Lake
चंद्रपूर :- भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, संयम आणि निसर्गपूजेचे प्रतीक असलेला छठ पूजा हा पारंपरिक सण चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या Ramala Lake किनारी अत्यंत भक्तीभावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘Chhath Puja’ festival celebrated with enthusiasm
या धार्मिक कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी दृकश्राव्य माध्यमा द्वारे उपस्थित राहून श्रद्धाळूंना छठ पूजेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. MD ड्रग्स विरोधात चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
कार्यक्रमाच्या प्रसंगी मनीष महाराज (स्वामीनारायण मंदिर, चंद्रपूर),
डॉ. मंगेश गुलवाडे (महामंत्री, भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर), प्रकाश धारणे, आणि सुरज पेदुलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन छठ सेवा समितीचे अध्यक्ष श्री. रुद्र नारायण तिवारी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चमूने अत्यंत नियोजनबद्धपणे केले. दुभाजक ऐवजी रस्त्याचे काम करा – जनविकास सेना आक्रमक
श्रद्धाळूंनी नदीकिनारी उपवास, स्नान व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, आनंद आणि समृद्धीची प्रार्थना केली.
छठ पूजेच्या माध्यमातून स्वच्छता, निसर्गाचा सन्मान आणि भक्तीभावाचा संदेश चंद्रपूरकरांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश झिटे, रवी लोणकर, प्रवीण गुरमवार, सोहम बुटले, हर्षल जीवने, पिंटू यादव, राजेश यादव, बंटी गुप्ता, रवी गुज्जा, सुनील परसराम, सुनील यादव, प्रेम बवारिया, मनभरन यादव, अमित निरंजने, उमेश आष्टणकर, आशिष गिरडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.