Stray animals problem in Civil Lines area
चंद्रपूर :- शहरातील सिव्हिल लाईन येथील आकाशवाणी जवळील भागात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणारी जनावरे वाहतुकीत अडथळा निर्माण करत आहेत. अनेकदा वाहनधारकांना अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. दोन वर्षातच पूल कोसळला, गुन्हे दाखल करा
नागरिकांच्या मते, या भागात सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जनावरे जमल्याने चालणे, वाहन ने-आण करणे अवघड बनते. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मोकाट जनावरांचा सामना करावा लागतो. अपघातग्रस्तांसाठी धाऊन आले आ. मुनगंटीवार

प्रशासनाकडे या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरे पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



