Thursday, April 2, 2026
HomeAgricultureधारिवाल कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम

धारिवाल कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम

Training program for farmers by Dhariwal Company

चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने “सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती”  हा प्रकल्प पांढरकवडा, वढा, धानोरा, अंतूर्ला, येरुर, सोनेगाव, शेनगाव, मोरवा, ताडाळी व चारगाव या गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वढा येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Training program for farmers from Dhariwal Infrastructure Company Chandrapur

कार्यक्रमाचे नेतृत्व देवेश कुमार (मुख्यमहाप्रबंधक, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय दादा कडू यांनी शेतकऱ्यांना पंचतत्त्वांचा दाखला देत जमीन शाश्वत व पर्यावरणपूरक ठेवण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

रंजीत बोबडे (अध्यक्ष, विकासगंगा संस्था) यांनी “पाणी अडवा, पाणी जिरवा” या म्हणीप्रमाणे शेतात पाणी मुरविण्यासाठी शोषखड्डे व बांधबंदिस्ते यांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
अमित गाडबैल (सचिव, विकासगंगा संस्था) यांनी सप्तपदी पद्धतीने कापूस पिकाचे व्यवस्थापन केल्यास जमिनीची सुपीकता व शाश्वत शेती टिकून राहते, असे सांगितले.

अनिश नायर (मुख्य व्यवस्थापक, धारीवाल) यांनी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

अनिकेत माने (तालुका कृषी अधिकारी, चंद्रपूर) यांनी फळबाग, यांत्रिकीकरण, ठिबकसिंचन यांसारख्या शासकीय कृषी योजनांची माहिती देत अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रमुख पाहुण्यांमध्ये किशोर वरारकर (सरपंच, वढा),  संचित रावत (धारीवाल कंपनी), विजय बल्की (माजी सभापती, चंद्रपूर), दातारकर (कृषी पर्यवेक्षक, चंद्रपूर), साईनाथ खेकारे (तालुका मंडळ कृषी अधिकारी),  विजय कुटे (कृषी सहाय्यक, चंद्रपूर) यांच्यासह कृषीसखी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय दळवी यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी मिथुन कलसार व पूजा चतुर यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात या चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular