Spontaneous response to the bullock pair decoration competition at Ghodpeth
चंद्रपूर :- भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय जनता पार्टी, घोडपेठच्या विद्यमाने शेतकऱ्यांचा आनंददायी सण बैल पोळा निमित्त भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. Bullock pair decoration competition at Ghodpeth
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर Hansraj Ahir यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सर्वश्री. हरीश्चंद्रजी अहीर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती भाजपा शहराध्यक्ष सुनिल नामोजवार, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा जिल्हा सचिव पूनम तिवारी, गौतम यादव, घोडपेठचे सरपंच अनिल खनके, उपसरपंच प्रदिप देवगडे, श्यामल अहीर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, केशव लांजेवार, विश्वनाथ निमकर, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे, अर्जुन लांजेवार, विश्वहिंदू परिषदेचे अशोक येरगुडे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

