Friday, April 17, 2026
HomeAgricultureकृषी महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

कृषी महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

Blood donation camp held at Anand Niketan Agricultural College Warora

कृषी महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयात दिनांक २२ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Blood donation camp held at Agricultural College

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय सावंगी मेघे येथील रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन आनंदवनातील सीता रतन हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. शिबिरामध्ये 28 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.

शिबिराला आनंदवन चे विश्वस्त डॉ. विश्वास पोळ, श्री सुधाकर कडू यांनी भेट दिली. शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी श्री राहुल तायडे यांचे नेतृत्वात राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. प्रदीप आकोटकर, डॉ. स्वप्निल पंचभाई , डॉ. रवींद्र बनकर, सौ मिली पुसदेकर, सौ स्मिता कुलसंगे, श्री विनोद बेलखुडे, श्री शंकर बनसोड तथा इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते

शिबीर स्थळी हॉस्पिटलचे डॉ. कृष्णा,श्री कपिल कदम तथा सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular