Bar Association’s one-day strike; Protest against permit room and excise duty hike
चंद्रपूर :- महाराष्ट्र सरकारने परमीट रूम व अबकारी शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा रेस्टॉरंट अँड बार असोसिएशनतर्फे सोमवार, दिनांक १४ जुलै रोजी एकदिवसीय बार बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद सिंह भाटिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. Bar Association’s one-day strike
अवघ्या १२ तासांत घरफोडी चा गुन्हा उघड
भाटिया यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १९ हजार परमीट रूम/बार असून, मागील काही वर्षांपासून शासनाच्या विविध धोरणांमुळे या व्यवसायावर आर्थिक फटका बसत आहे. परमीट रूमवर लावलेला १०% व्हॅट, यावर्षी १५% फी वाढ आणि आता अबकारी शुल्कात दीडपट वाढ केल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे जिल्ह्यातील विक्रीत सुमारे ५०% घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Protest against permit room and excise duty hike
अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांचा छापा
जिल्ह्यातील सुमारे ६५० बार आणि रेस्टॉरंटवर या निर्णयाचा परिणाम होणार असून, विक्री कमी झाल्यास त्यापैकी किमान २५% बार बंद पडण्याचा धोका आहे. परिणामी, हजारो लोकांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो.
शासनाने घेतलेला टॅक्स वाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकदिवसीय बार बंद आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे भाटिया यांनी स्पष्ट केले.
