Tiger carcass found in Tadoba buffer zone
चंद्रपूर :- दिनांक 20 जून रोजी एक प्रौढ वाघीण (T – 177), वय अंदाजे 7 वर्षे, हिचा मृतदेह मुल वनपरिक्षेत्राच्या कंपार्टमेंट क्रमांक 360, बीट डोनी, राउंड जानाळा, ताडोबा बफर विभाग येथे आढळून आला. Tiger carcass found in Tadoba buffer zone
सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळ सुरक्षित केले व आवश्यक कार्यवाही सुरू केली. मृत वाघिणीचा मृतदेह ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलवण्यात आला. तेथे तपशीलवार शवविच्छेदन करण्यात आले. Tadoba Andhari Tiger Project
प्राथमिक अहवालानुसार मृत्यूचे कारण तीव्र हृदय व श्वसन विकृती (Acute Cardio-Respiratory Failure) असे निदान करण्यात आले आहे. शवविच्छेदनादरम्यान सर्व अवयव सुस्थितीत आढळून आले, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शिकारीचा अथवा घातपाताचा संशय नाही असे वनविभागाने स्पष्ट केले.
संपूर्ण कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात आली.
या वेळी बंडू धोत्रे, प्रतिनिधी, NTCA, मुकेश भांदेकर, मानद वन्यजीव रक्षक, एस.एस. डुबे, सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा बफर विभाग; डॉ. रवीकांत एस. खोब्रागडे, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी व प्रमुख, रॅपिड रेस्क्यू टीम, TATR, डॉ. कुंदन पोडचेलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC, चंद्रपूर; डॉ. कडुकर, निवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी (ACAH), तसेच पेंडोर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुल आणि मुल रेंज व ताडोबा बफर विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला.