**प्रेस नोट**
**चंद्रपूर महापालिकेतील दीड कोटींचा रस्ता बांधकाम निकृष्ठ दर्जाचे – वडगाव व तुकुम प्रभागातील प्रत्यक्ष पुराव्यानंतर आम आदमी पक्षाचा घणाघात**
चंद्रपूर :- शहरात सध्या निवडणुकीपूर्वी विकासकामांचा धडाका सुरु असल्याचे भासवले जात आहे. महानगर पालिकेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करून विविध ठिकाणी सीसी रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, आम आदमी पक्षाने या कामांमध्ये गंभीर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार होत असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडगाव प्रभागातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी रस्त्याची स्ट्रेंथ तपासण्यात आली. महापालिका व ठेकेदाराने M-20 दर्जाच्या रस्त्याचे दावे केले होते, मात्र प्रत्यक्षात फक्त M-13 इतकीच स्ट्रेंथ नोंदवली गेली.
हीच स्थिती तुकुम प्रभागातील रस्त्यांमध्ये सुद्धा आढळून आले. तिथेही रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे आम आदमी पक्षाने जनतेसमोर मांडले आहे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जागेवर उपस्थित राहून रस्त्यांचा दर्जा, खोली, जाडी, आणि मजबुती याबाबतचे प्रत्यक्ष पुरावे दाखवत आहेत.
हे सर्व रस्त्याचे काम एका विशिष्ट ठेकेदारामार्फत होत असून, तो ठेकेदार स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहेत आमदारांच्या राजकीय पाठबळामुळे कामाचे दर्जा तपासले जात नाही, अधिकारी मौन बाळगतात आणि ठेकेदाराला मोकळे रान मिळते.
हे संपूर्ण प्रकरण निवडणुकीपूर्वी निधीच्या लुटीचा स्पष्ट नमुना आहे. रस्ते खराब दर्जाचे असूनही पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. नागरिकांच्या कर रुपी पैशाची ही सरळसरळ फसवणूक असून, भ्रष्टाचाराचे हे जाळे आता जनतेसमोर उघड होत आहे.
याआधीही चंद्रपूर महानगरपालिकेतील
* **फाऊटन बनावट खर्च**,
* **ड्रेनेज लाईनसाठी पेशाची उधडपट्टी पण न झालेली कामे**,
* **अमृत कलश योजना पन नागरिकन्ना पाणी नाही अनियमितते**,,
यासारख्या अनेक बाबींमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत.
या संदर्भात **वडगाव आणि तुकुम प्रभागातील प्रत्यक्ष फेसबुक लाईव्ह करून लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्यात आले आहे.** लवकरच **शहरातील इतर प्रभागांतील कामांचेही परीक्षण व सच्चाई जनतेसमोर मांडली जाणार** आहे.
या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे:
🔹 जिल्हाध्यक्ष – **मयूर राईकवार**
🔹 शहराध्यक्ष – **योगेश गोखरे**
🔹 जिल्हा सचिव – **राजकुमार नगराडे**
🔹 शहर संघटन मंत्री – **संतोष बोपचे**
🔹 शहर पदाधिकारी – **विशाल विरंमवार**
🔹 क्रिश कपूर, आदित्य नंदनवार
🔹 अॅड. तबस्सुम शेख व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
—
निकटवर्तीय ठेकेदार – बोगस रस्ते – मौन आमदार = भ्रष्ट युती
चंद्रपूरकर जनतेने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे!
फेसबुक लाईव्ह लिंक https://www.facebook.com/share/v/1EzkaCJRbo/
