Pay salaries of college teachers and non-teaching staff urgently
महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत करा
*सहसंचालक यांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे निवेदन*
चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून प्रत्येक महिन्याचे वेतन उशिराने होत असून एप्रिल 2025 चे वेतन मे महिना संपत आला असताना सुद्धा झाला नाही या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने डॉ . संतोष चव्हाण सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर यांना निवेदन देऊन वेतन त्वरित करण्याची मागणी केली आहे. Pay salaries of college teachers and non-teaching staff urgently
यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी दूरध्वनी द्वारे डॉ .संतोष चव्हाण सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर यांच्याशी चर्चा केली असता काही तांत्रिक अडचणीमुळे पगार होत नसल्याची दिलगिरी व्यक्त करून येत्या दोन-तीन दिवसात वेतन होत असल्याची माहिती दिली आहे. Gondwana Young Teachers Association’s statement to the Joint Director
वेतन उशिरा होण्याचा परिणाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून अनेक महाविद्यालयिन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे गृह कर्ज, वाहन कर्ज, इतर कर्जाचे हप्ते थकलेले आहे त्याचा परिणाम शिक्षकांच्या आर्थिक नियोजनावर होत असून शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची वेतन नियमित व लवकरात लवकर करून त्यांना वेतना अभावी होत असलेल्या आर्थिक समस्येतून त्वरित बाहेर काढावे या संदर्भातले निवेदन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर यांना देण्यात आलेले आहे.
