Friday, April 17, 2026
HomeMPखा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वॉटर फिल्टर एटीएमचे लोकार्पण

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वॉटर फिल्टर एटीएमचे लोकार्पण

MP Pratibha Dhanorkar inaugurated water filter ATMs in Karanji and Tulana

 चंद्रपूर :- खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या शुभहस्ते करंजी आणि  तुळाना येथे प्रत्येकी एका अत्याधुनिक वॉटर फिल्टर एटीएम मशीनचे Water Filter ATM Machine लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे दोन्ही गावांतील नागरिकांना आता सहज आणि परवडणाऱ्या दरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे. या दुहेरी लोकार्पण सोहळ्यांमुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते.

आज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वॉटर फिल्टर एटीएम मशीनचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजुभाऊ चिकटे माजी सभापती, कृ. ऊं. बां. वरोरा, दिनेश कष्टी संचालक, कृउ बा वरोरा, मनीषा ढेंगळे सरपंच, तुळाना, राजू आसेकर ग्रा. पं. सदस्य, तुळाना , समर्थ बोढे ग्राम पंचात सदस्य तुळाना, सविता काळे सरपंच, करंजी, सुजीत कष्टी उपसरपंच, करंजी, अभिमान काळे, गणेश मुसळे पोलीस पाटील, करंजी, देविदास पा. कष्टी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे, बसंत सिंग, बाळू चिंचोलकर आणि दराडे साहेब(शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्यासह परिसरातील नागरिक आणि शेकडो गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वॉटर फिल्टर एटीएममुळे तुळाना आणि करंजी येथील आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना आता २४ तास शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे महिला भगिनी आणि लहान मुलांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विविध आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. हा प्रकल्प गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे आमचे ध्येय आहे. तुळाना आणि करंजी येथे या वॉटर फिल्टर एटीएमची स्थापना हा त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सुविधेमुळे दोन्ही गावांतील नागरिकांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांना दिलासा मिळेल.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular