Woman dies after wall collapses in Datala
चंद्रपूर:- पडक्या घरात राहणाऱ्या महिलेचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दाताला परिसरात आज दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी घडली. बेबीताई राजहंस लिंगायत (50 वर्ष) असे मृतक महिलेचे नाव आहे.
शहराला लागून असलेल्या दाताला गावातील गगनगिरी नगर भागात पडक्या घरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबावर आज सुटलेल्या वादळाने संकट कोसळले.
संध्याकाळी सुटलेल्या वादळाने राहत्या घराची भिंत बेबीताई यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासनीस पाठवण्यात आला आहे.