Friday, April 17, 2026
HomeAccidentबाबूपेठ उड्डाणपुला खालील भंगार दुकानाला भीषण आग

बाबूपेठ उड्डाणपुला खालील भंगार दुकानाला भीषण आग

A massive fire broke out at a scrap shop under the Babupeth flyover

चंद्रपूर :- बाबूपेठ परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Flyover Babupeth खाली असलेल्या भंगार दुकानाला आज सकाळी आगीने अचानक पेट घेतला, भंगार साहित्यामुळे आगीने भीषण स्वरूप प्राप्त केले, बाजूलाच चांदाफोर्ट रेल्वेचा रूळ आहे सुदैवाने याकाळात कोणतीही रेल्वे आली नाही अन्यथा मोठी घटना घडली असती. massive fire broke at a scrap shop

चंद्रपूर शहरातील नव्याने सुरू झालेल्या उडानपुराला दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी पहाटे उडानपुरा खाली असलेल्या भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागली या आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की त्याचा धूर उडान पूलावर पसरला होता बाजूला लोकवस्ती असल्याने आगीचा लोंढा घरापर्यंत पसरत होता, Babupeth Flyover

स्थानिकांनी अग्निशामक पथकाला पाचारण केल्याने अग्निशमन काही वेळातच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही,  सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही आणि वेळेतच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular