Support of Gondwana University Young Teachers’ Association to the state level hunger strike of Old Pension Association in Wardha
चंद्रपूर :- 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या म. रा.ना.से.अधिनियम 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन जसच्यातशी लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी 2 ऑक्टोंबर 2024 पासून वर्धा येथे राज्यस्तरीय आमरण उपोषणाला बसले आहेत.या राज्यस्तरीयआमरण उपोषणाला व तालुकास्तरीय साखळी उपोषणाला आणि मागणीला गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने पाठिंबा व समर्थन दिले असून hunger strike of Old Pension Association in Wardha
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार यांच्या स्वाक्षरीचे पाठिंबा व समर्थांचे पत्र संघटनेच्या वतीने प्रतिनिधीक स्वरूपात गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे पदाधिकारी डॉ. मिलिंद भगत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सतीश पेटकर,डॉ. राहुल ठोंबरे ,डॉ. किशोर महाजन, डॉ. राहुल मानकर , डॉ.योगेश बारसागडे प्रा. डी.वाय.नगराळे यांच्या शिष्टमंडळाचे गोंडवाना यंग टीचर संघटनेच्या वतीने वर्धा येथे उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबाचे पत्र दिले असून तेथील उपोषणकर्त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. Gondwana University Young Teachers’ Association
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन सदैव जुन्या पेन्शन लढत सक्रिय सहभागी झाली असून याआधी संघटनेच्या वतीने जुन्या पेन्शन यात्रेला, अधिवेशनाला व संघर्षाला कायम पाठिंबा व सहभाग देत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने वर्धा येथे आयोजित आमरण उपोषणाला आणि तालुकास्तरीय साखळी उपोषणाला गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या वतीने पाठिंबा व समर्थन देण्यात आले असून संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना या आमरण उपोषणाला पाठिंबा आणि समर्थन देण्याचे संघटनेने आवाहन केलेले आहे.
