Friday, October 31, 2025
HomeMaharashtraचंद्रपूर परिमंडळात ४९ गणेश मंडळांनी घेतली अधिकृत वीज जोडणी

चंद्रपूर परिमंडळात ४९ गणेश मंडळांनी घेतली अधिकृत वीज जोडणी

49 Ganesh Mandals under Chandrapur Circle have received official electricity connections

चंद्रपूर :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळपर्यंत चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत तब्बल ४९ गणेश मंडळांनी वीज जोडणी घेतली, अशी माहिती MSEDCL महावितरणतर्फे देण्यात आली. 49 Ganesh Mandals under Chandrapur Circle have received official electricity connections

चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४५ गणेश मंडळांचे अर्ज महावितरणकडे आले आहेत. त्यापैकी ४२ गणेश मंडळांनी आवश्यक रक्कम भरून वीज जोडणी घेतली असून, उर्वरित ३ मंडळांचे अर्ज प्रलंबित आहेत. या मंडळांना कोटेशन दिले असून, वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरु आहे. राजुरा गडचांदूर मार्गावर भीषण अपघात, 6 ठार

गडचिरोली जिल्ह्यातून एकूण १० गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७ मंडळांना पैसे भरल्यानंतर वीज जोडणी देण्यात आली असून, उर्वरित ३ अर्ज प्रलंबित आहेत. या मंडळांना कोटेशन दिले असून, लवकरच वीज जोडणी देण्यात येणार आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, या अर्जांची संख्या आगामी दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अंतिम वीज बिलाची रक्कम वजा करून उर्वरित अनामत रक्कम मंडळांना विना विलंब परत केली जाणार असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular