Friday, May 22, 2026
HomeCrimeवशीकरणाच्या आमिषाने जंगलात नेऊन हत्या

वशीकरणाच्या आमिषाने जंगलात नेऊन हत्या

Lured into the forest with the promise of a vashikaran (black magic) ritual and then murdered

चंद्रपूर :- जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भिसी हद्दीतून दिनांक १७ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व भिसी पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा हा खुनाचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणला आहे. Brutal murder of a 22 year old man comes to light

दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी तक्रारदार गिता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे तक्रार नोंदवली होती. त्यात त्यांनी नमूद केले की, त्यांचा मुलगा बादल ज्ञानेश्वर मेश्राम (वय २२) हा दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता उमरेड येथे सर्व्हिसिंगला टाकलेली दुचाकी आणतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र तो घरी परत न आल्याने मिसिंग क्रमांक ३/२०२६ नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, भिसी पोलीस, गोपनीय बातमीदार व सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे आणि खून करून पुरावा नष्ट करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी देवानंद गोवर्धन श्रीरामे (वय ४०, रा. मिनझरी), आरीफ उस्मान खान पठाण (वय ३२, रा. नेताजी वार्ड, चिमूर, ह.मु. मिनझरी) व सौरभ सुभाष चौधरी (वय २२, रा. मिनझरी) यांनी संगनमताने हा गुन्हा केला. “तुला आवडणारी मुलगी भेटेल, वशीकरण करू” असे आमिष दाखवून त्यांनी बादल मेश्राम याला मुरमार – मिनझरी जंगल शिवारातील आरोपी क्र. १ च्या शेतात नेले. तेथे नायलॉन दोरीने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. vashikaran (black magic) त्यानंतर मृतदेह जंगलातील नाल्यात खड्डा खोदून पुरण्यात आला. तसेच दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मृतकाची दुचाकी व मोबाईल इतरत्र फेकून देण्यात आला. Chandrapur Crime

सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात सपोनि मंगेश भोंगडे (ठाणेदार, भिसी), सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि रविंद्र वाघ, भारत थिटे, सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, पोअं. अमोल सावे, प्रसाद धुलगुंडे, हिरालाल गुप्ता, सतिश झिलपे, मंगेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने ही कारवाई केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular