Saturday, January 17, 2026
HomeChief Ministerचंद्रपुरात रंगणार 26 वा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव

चंद्रपुरात रंगणार 26 वा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव

The 26th Maharashtra State Inter University Sports Festival will be held at Chandrapur

चंद्रपूर :- 26 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2024 दि. 18 फेब्रुवारी ते दि. 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये आयोजित असून राजभवनद्वारे या महोत्सवाचे यजमानपद गोंडवाना विद्यापीठाला मिळाले असल्याने या सर्व महोत्सवाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात येत आहे. 26th Maharashtra State Inter University Sports Festival

गोंडवाना विद्यापीठाला अल्पावधीतच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यजमानपदाचा मिळालेला हा मान निश्चितच केवळ विद्यापीठासाठीच नव्हे तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरीकांसाठीही ही अभिमानाची बाब आहे.

सदर महोत्सवाचा उद्घाटकीय समारंभ दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता तालुका क्रीडा संकुल, विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाक्रिष्णन हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. Inauguration by Union Minister of State for Youth Affairs and Sports Raksha Khadse

महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार असून आदिवासी विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा डॉ. अशोक रामाजी ऊईके तसेच क्रीडा व युवक तसेच अल्पसंख्याक विकास औकाफ मंत्री ना. दत्तात्रय विठोबा भरणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील खासदार, आमदार महोदय तसेच प्रशासकीय सर्व प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहेत.

खेळाचे प्रकार वेळ व मैदाने:
महोत्सवामध्ये मुले व मुली यांचे कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स व चेस अशा 8 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार असून त्या सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 व सायंकाळी 4.00 ते रात्री 9.00 अशा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या सर्व स्पर्धा क्रीडा प्रकारानुसार पुढीलप्रमाणे मैदानावर नियोजित आहेत.

कबड्डीचे सामने आरएसएसएस, विसापूर, 4 मैदाने , खो-खो आरएसएसएस, विसापूर, 4 मैदाने, व्हॉलीबॉल आरसीईआरटी, चंद्रपूर, 4 मैदाने, बास्केटबॉल चंद्रपूर, सैनिक स्कूल, विसापूर, 4 मैदाने, बॅडमिंटन जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (बॅडमिंटन हॉल), टेबल टेनिस तालुका क्रीडा संकुल, विसापूर, बॅडमिंटन हॉल) ॲथलेटिक्स तालुका क्रीडा संकुल, विसापूर व चेस (बुध्दीबळ) आरसीईआरटी, चंद्रपूर इन हॉल) येथे आयोजित करण्यात आलेल आहेत.

सहभागी स्पर्धक (विद्यार्थी – विद्यार्थीनी), विद्यापीठे :
सदर क्रीडा महोत्सवासाठी 23 विद्यापीठांमधील 3 हजार 723 इतकी नोंदणी झाली असून यामध्ये खेळाडू व संघव्यवस्थापक यांचा समावेश आहे. निमंत्रित मान्यवर, विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक असे अंदाजित 4 हजार 500 जण या महोत्सवामध्ये सहभागी होतील.

निवास व्यवस्था
पुरुष व महिला खेळाडूंची निवास व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली असून, महिला खेळाडूंची निवास व्यवस्था चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महिला स्टाफ क्वार्टर, तसेच राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह आणि बल्लारपूर येथील क्रीडा संकुल येथील खेळाडूंचे निवासस्थान येथे करण्यात आली आहे.

पुरुष खेळाडूंची निवास व्यवस्था चंद्रपूर येथील विकास केंद्र, विसापूर येथील क्रीडा संकुल, आरएसएसएम कॉलेज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बल्लारपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्टाफ क्वार्टर, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलांचे वसतिगृह आणि बल्लारपूर येथील संत तुकाराम सभागृह या ठिकाणी करण्यात आली

आरएसएसएम, विसापूर येथे 1 हजार 188, तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे 942, आरसीईआरटी, चंद्रपूर येथे 891, सैनिक स्कूल, बल्लारपूर येथे 609 तर जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे 370 अशा एकूण 4 हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परिवहन व्यवस्था:
विद्यार्थ्यांना त्यांच्या निवास व्यवस्थेपासून मैदानापर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 25 बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत.
दि. 17 फेब्रुवारी रोजी खेळाडूंना बस स्टॉप व रेल्वे स्टेशन येथून आणण्यासाठी 5 बसेस व दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी खेळाडूंना बस स्टॉप व रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 2 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकिय सुविधा:
क्रीडा स्पर्धांमध्ये आकस्मिकपणे खेळाडू जखमी झाल्यास अत्यावश्यक सेवेसाठी वैद्यकीय चमूसह 8 रुग्णवाहिका दररोज 24 तास उपलब्ध करुन देण्याबाबत मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर व मा. अधिष्ठाता, शासकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांना पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांना सर्व सहभागी खेळाडूंकरीता प्रथमोपचार व आकस्मिक वैद्यकीय अडचण लक्षात घेता औषधी व साहित्यांचा पुरवठा करण्याकरीता विनंती करण्यात आलेली आहे. तसेच आकस्मिकपणे लागणाऱ्या औषधांकरीता निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आलेली आहे.

समारोपीय कार्यक्रम:
महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम शनिवार दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता तालुका क्रीडा संकुल, विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे होणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हंसराज अहिर, अध्यक्ष इतर मागासवर्गीय आयोग, भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे हे राहणार आहेत. तर गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

यापूर्वी विद्यापीठाने आयोजित केलेले राज्यस्तरीय महोत्सव:
यापूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने राजभवनद्वारे घेण्यात येणाऱ्या 13 वा आंतर विद्यापीठ संशोधन उत्सव आविष्कार 2018-19, 17 वा आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 व राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आव्हान-2023 अशा तीन राज्यस्तरीय महोत्सवांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यावेळी प्र कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिसभा सदस्य डॉ. जयेश चक्रवर्ती, निलेश बेलखेडे, डॉ. प्रवीण जोगी, संजय रामगिरवार, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, अधिष्ठाता डॉ. संजय निंबाळकर

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular