चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरविणाऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या सराईत टोळीविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. Chandrapur Police crack down on drug smugglers
रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्र. ९८०/२०२६ मध्ये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(b)(ii)(b) व २९ अन्वये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. MCOCA invoked for the first time
या प्रकरणातील आरोपींमध्ये वसीमखान आरिफखान उर्फ कालू (४०), नसीबखान आरिफखान उर्फ मालू (३९), जुबेर करिम खान यांचा समावेश असून, एक आरोपी पाहिजे आहे. Chandrapur Police
सदर आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ तस्करीसह शरीराविरुद्धच्या मारामारीच्या २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या संघटित गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. Chandrapur Crime
हा सविस्तर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यास मंजुरी दिली.त्यानुसार ४ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके तसेच त्यांच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
