Friday, May 22, 2026

*आमदार जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे होणार त्या पुलाचे बांधकाम सुरू*

*हनुमान खिडकी येथील झरपट नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर*

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे हनुमान खिडकी परिसरातील झरपट नदीवर पुलाच्या बांधकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पूर आणि पावसामुळे सदर पूल शतिग्रस्त झाला होता. त्यामुळे रहदारीला अरथडा निर्माण झाला होता.

सदर पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलामुळे विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापारी आणि कामगार वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

झरपट नदीवरील पुलामुळे वाहतूक सुलभ होऊन नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचेल. या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पायाभूत सुविधा उभारण्यावर माझा कायम भर राहील,” असे आमदार किशोर जोरगेवर यांनी सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular