Wednesday, November 5, 2025
HomeCrimeतंबाखू माफियावर लगाम घालण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करा

तंबाखू माफियावर लगाम घालण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करा

set up a high-level inquiry committee to rein in Tobacco mafia

चंद्रपूर :- जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू (गुटखा/पान मसाला) चा अवैध धंदा दिवसेंदिवस फोफावत असून, त्यामुळे ओरल कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी अधिवक्ता प्रीतिशा शाह यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. set up a high-level inquiry committee to rein in Tobacco mafia चंद्रपूर कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण, मोहन भागवत यांच्या हस्ते

सदर अवैध व्यापार FSSAI कायदा 2006, COTPA 2003 आणि महाराष्ट्र गुटखा बंदी अधिनियम 2012 चा सरळ भंग करतो. जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत ओरल कॅन्सर रुग्णांची संख्या तब्बल २५ टक्क्यांनी वाढली असून, त्यातील ६० टक्के रुग्ण हे ४० वर्षांखालील आहेत. विशेषतः शाळा-कॉलेज परिसर, बसस्टँड व बाजारपेठांमध्ये २० रुपयांत गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने १५ ते १९ वयोगटातील मुले व्यसनाधीन होत आहेत, ही बाब चिंताजनक आहे.

या अवैध धंद्यामागे अपराधी तत्त्वांचे जाळे असून त्यात तस्करी, करचोरी आणि माफिया नेटवर्कचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. पोलिस व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा गुटखा व्यवसाय खुलेआम सुरु असून, कारवाई केवळ चिल्लर विक्रेत्यांपुरती मर्यादित असल्याचे अधिवक्ता शाह यांनी निवेदनात नमूद केले आहे. मुख्य सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर, गोदाम मालक आणि माफिया यांच्यावरील कारवाईसाठी स्वतंत्र चौकशी समिती आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशी समितीचे उद्देश
या समितीमार्फत गुटखा व्यवसायाचे मूळ कारण, सप्लाय चेन आणि संरक्षण देणारे घटक शोधणे, तसेच मास्टरमाइंड तस्करांची ओळख पटवून कालबद्ध अहवाल सादर करण्याचा प्रस्ताव आहे.

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख, अधिवक्ता प्रीतिशा शाह, सचिव धीरज तामगडे आणि समिती सदस्य उपस्थित होते.

“गुटख्याच्या या कर्करोगी जाळ्याला आळा घातला नाही तर हजारो कुटुंबे उध्वस्त होतील आणि चंद्रपूरला ‘कॅन्सर फ्री जिल्हा’ बनवण्याची संधी गमावली जाईल,” असे शाह यांनी निवेदनात स्पष्ट केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular