चंद्रपूर :- श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती व कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी सायं. 5 वाजेपासुन “विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धा’’ आयोजित करण्यात आली आहे. Vidarbha level Dahi Handi competition in Chandrapur
स्थानिक विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथील श्री विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेच्या भव्य पटांगणावर होत असलेल्या या दहीहंडी महोत्सवास पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमास महापौर सौ. संगिताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर व अन्य प्रमुख मान्यवर अतिथी, चंद्रपूर महानगर भाजपा, भाजयुमोचे सन्माननिय पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. Kamal Sporting Club
या दहीहंडी कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमल स्पोर्टीग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
