The seven-day sports festival at the Infant Convent concluded with a bang
चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दिनांक १६ ते २३ डिसेंबर या दरम्यान सात दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाला उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवाची सुरुवात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मशाल पेटवून करण्यात आली.
या क्रीडा स्पर्धेत इयत्ता १ ते ५ या विद्यार्थ्यांसाठी धावणे, फ्रॉग जम्प , मार्बल रेस, झिगझॅक रेस, बुक बॅलेंसिंग रेस ,अशा विविध खेळाच्या स्पर्धाचे आयोजन केले होते.
तसेच इयत्ता ६ ते १० या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या गटानुसार कबड्डी, व्हॉलीबॉल ,फुटबॉल, लगोरी ,आट्यापाट्या अशा विविध खेळाच्या स्पर्धेत भाग घेतला.
या स्पर्धेत सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेता ट्रॉफी प्राप्त केली. व स्टेट शाळेतील विद्यार्थ्यांनी उपविजेता ट्रॉफी प्राप्त केली. या क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी व शाळेचे शारीरिक शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल शिरसागर, शुभम बन्नेवार व शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकांत सर व खाडे सर यांनी केले.