*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपुरात गणेश मंडळांचा सत्कार व विसर्जन रॅलीचे स्वागत सोहळा*
चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि बंधुभाव जपणाऱ्या गणेश मंडळांच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांचे स्वागत करून त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याने कार्यक्रमाला उत्सवी वातावरण लाभणार आहे.
या सोहळ्यास जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, सेल प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
