चंद्रपूर :- गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच भव्य विसर्जन रॅलीचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. Ganeshotsav Visarjan
हा भव्य स्वागत व सत्कार सोहळा शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता, संस्कृती आणि बंधुभाव जपण्याचे कार्य शहरातील विविध गणेश मंडळे अविरत करत असतात. या मंडळांच्या योगदानाचा गौरव करणे आणि विसर्जन मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, सेल प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
