Youth drowns in lake in Chindhimal
चंद्रपूर :- नागभीड तालुक्यातील मौजा चिंधिमाल येथील महेश अभिमन सलामे (वय २९) या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. ही घटना सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली. Youth drowns in lake in Chindhimal
घटनास्थळावरून महेश सलामे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.