चंद्रपूर :- भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना ही अत्यंत व्यापक, उदार आणि मानवकल्याणाचा विचार करणारी आहे. येथे ‘कुटुंब’ म्हणजे केवळ एकाच रक्ताच्या नात्याने बांधलेले व्यक्तींचे वर्तुळ नाही; तर त्या उद्योगात कार्य करणारा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व सर्व कामगार हा त्या कुटुंबाचाच एक भाग मानला गेला आहे हि संस्कारक्षम भावना धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड मध्ये निपजत आहे.
निसर्ग व व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही संस्कृती मानवी श्रमाचा आणि निर्मितीचा गौरव करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याच समृद्ध आणि गौरवशाली परंपरेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे भगवान विश्वकर्मा जयंती, जी अनादी काळापासून या भूमीत साजरी होत आली आहे हि आज उद्योग परिसरात सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत असल्याचा अगतिक आनंद होत आहे असे भावोद्गार धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड चे प्लांट हेड देवेश कुमार यांनी व्यक्त केले. उद्योग परिसरात आयोजित विश्वकर्मा जयंती सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
प्रसंगी भगवान विश्वकर्मांची विधिवत पूजा अर्चना, होम हवन करून स्थापना करण्यात आली. यावेळी उद्योगातील सर्व वरिष्ठ अधिकारी – कर्मचारी – कामगार यांची अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थिती होती. Vishwakarma Jayanti celebrated at Dhariwal
सर्व कष्टकरी आणि तंत्रज्ञ भगवान विश्वकर्मा यांना आपले दैवत व पूर्वज मानतात. रामायण, महाभारत, स्कंदपुराण आणि वेदांमध्ये उल्लेख असलेले भगवान विश्वकर्मा हे केवळ एका विशिष्ट पौराणिक व्यक्तिमत्त्वापुरते मर्यादित नाहीत; तर ते स्थापत्य, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि कलाकुसरीच्या अथांग कौशल्याचे राष्ट्रव्यापी प्रतीक आहेत. द्वारका, इंद्रप्रस्थ, लंका यांसारख्या भव्य नगरांचे निर्माण असो वा रामसेतू आणि पुष्पक विमानाची रचना असो, विश्वकर्मा ही संकल्पना मानवी कल्पकता आणि श्रमाच्या सर्वोच्च शिखराचे प्रतिनिधित्व करते. मात्र, विश्वकर्मा पूजनाचे महत्त्व केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून, त्यात ‘समाजहितासाठी त्याग’ हा उदात्त संदेश दडलेला आहे असेही देवेश कुमार यांनी पुढे बोलतांना सांगितले.
निर्मितीचा ध्यास, कौशल्याचा गौरव आणि समाजहिताचा त्याग शिकवणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांच्या विचारांवर चालणे हे खऱ्या अर्थाने जयंती सोहळा साजरा करण्याचे ध्येय अंगीकारून कार्य करावे व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगिरी यांनी आपली एक कुटुंब समजून “एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ ॥” या संत तुकारामांच्या सुंदर वचनाला साक्षात घडविण्याचा सार्थक प्रयत्न धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड मध्ये व्हावा असे आवाहन यावेळी देवेश कुमार यांनी केले.
