चंद्रपूर :- शहरातील नामांकीत कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूरच्या वतीने दि. 6 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत बाबुपेठ येथील जय शितलामाता मंडळाने 6 स्तर उभारून 30 फूट उंचावरील दहीहंडी फोडून विक्रम प्रस्थापित केला व हे मंडळ विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयी चमुचे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir व या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रू. 1 लाख रूपयांचे पारितोषिक प्रदान करून विजयी गोविंदांचा सन्मान करण्यात आला.
स्थानिक विठ्ठल मंदिर वार्डातील श्री विठ्ठल व्यायाम शाळेच्या भव्य पटांगणावर अभुतपूर्व संख्येतील प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, डॉ. अशोक जिवतोडे, खुशाल बोंडे, महापौर संगिताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्ष मनस्वीताई गिऱ्हे, नगराध्यक्ष निलेश ताजणे, प्रकाश देवतळे, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, शेखर शेट्टी, अजय वैरागडे, धन्नाजी येरेवार, सचिन कोतपल्लीवार, भालचंद्र दानव, किरणताई कोतपल्लीवार, डॉ. विजय देवतळे यांची विषेश उपस्थिती लाभली. याप्रसंगी तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, रविंद्र गुरनुले, राजू घरोटे, विनोद शेरकी, मनोज पाल, मयुर हेपट, श्यामल अहीर, सुभाष आदमने, स्वप्निल डुकरे, मोहन चौधरी, हर्षवर्धन अहीर, राजवीर चौधरी, कमल कजलीवाले, शिवम त्रिवेदी, शाम कनकम, प्रदिप किरमे, सारीकाताई संदूरकर, मथुराप्रसाद पांडे, गणेश गेडाम, सुदामा यादव, विनोद खेवले, संजय तिवारी, गणेश पिंपळकर, निरीक्षण तांद्रा, कौसर खान, विनोद शेरकी, उग्रसेन पांडे यांचेसह अन्य मान्यवर अतिथींची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लहान बालकांनी श्रीकृष्णाच्या वेशभुषेत श्रीकृष्ण थीमवर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यासोबतच पुष्पा अॅक्ट शो सादर करण्यात आला. या आकर्षक सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे आणि मनोरंजनाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रघुवीर अहीर यांनी दहीहंडी कार्यक्रमामागील कमल स्पोर्टींग क्लबची भुमिका विशद करीत या कार्यक्रमाचे महत्व आणि पावित्र्य जपण्याची सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. दहीहंडी भगवान श्रीकृष्ण यांचे युगानूयुगे ऋणानुबंध प्रत्येकांनी जपले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार तसेच आमदार करण देवतळे यांनी जन्माष्टमी आणि दहीहंडी कार्यक्रमामागील सनातन संस्कृतितील महत्व विषद केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रशंसोद्गार काढले. या स्पर्धेमध्ये अनेक मंडळाच्या गोविंदांनी उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राहुल गायकवाड, मयुर झाडे, विपीन मेंढे, जितेश वासेकर, जगदिश दंडेले, आशय चंदनखेडे, राजेश खनके, अभिजीत आकोजवार, अमोल माळवे, मयूर भोकरे, राहुल सुर्यवंशी, ईश्वर वाघमारे, सुबोध चिकटे व कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन राहुल बनकर व ऋतुजा नागापूरे यांनी केले. कार्यक्रमास प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.
