Bharatiya Janata Party pays tribute to those killed in Ahmedabad plane crash
चंद्रपूर :- अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विमान दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला असून चंद्रपूर जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी BJP भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Tribute to those killed in Ahmedabad plane crash
कार्यक्रमाला भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आस्वाणी, एड.सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शितल कुळमेथे, शितल गुरनूले, संगीता खांडेकर, कल्पना बबुलकर, पुरुषोत्तम राऊत, प्रलय सरकार, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, राकेश बोमनवार, शितल ईटनकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अॅड. हरिष मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुर्घटनेतील मृतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळून करण्यात आली. Ahmedabad plane crash यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले की, ही दुर्घटना केवळ संबंधित कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायक आहे. मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला.