Renowned businessmen and social activists publicly join Aam Aadmi Party
चंद्रपूर :- बाबुपेठ परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. राजूभाऊ तोडासे यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये अधिकृत जाहीर प्रवेश केला. AAP
हा पक्ष प्रवेश आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या नेतृत्वात तर वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचा अध्यक्षतेखाली महानगर कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री. तोडासे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बाबुपेठ परिसरातील आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक बळात मोठी भर पडेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलताना तोडासे म्हणाले की, ‘आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सामान्य जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो. पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसेवेच्या तत्वांवर चालणाऱ्या या पक्षात आता मी माझं योगदान देणार आहे’
या कार्यक्रमाला महानगर कार्यकारिणीतील शहर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, संघटन मंत्री संतोष बोपचे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा विधी सल्लागार ऍड किशोर पुसलवार, माजी सैनिक सुनील सदभय्या, मनीष राऊत, संतोष दोरखंडे, सिकंदर सागोरे, बलराम केसकर इत्यादी उपस्थित होते.