Friday, July 17, 2026
HomeEducationalविधान भवनात उच्च शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा

विधान भवनात उच्च शिक्षण विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा

Significant Discussion on Higher Education in the Vidhan Bhavan

मुंबई / चंद्रपूर :- राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी विधान भवन येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Minister of Higher and Technical Education, Chandrakant Patil यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी विभागातील महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले. Significant Discussion on Higher Education

चर्चेदरम्यान गडचिरोली येथे सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणातील रिक्त पीठासीन अधिकारी पदावर नियमित नियुक्ती करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
याशिवाय, राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांसाठी डीसीपीएस (परिभाषित अंशदान योजना) अंतर्गत २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात शासनाचा १० टक्के हिस्सा जमा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. डीसीपीएस/एनपीएस निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानासाठी सेवा जोडण्याबाबत परिपत्रक काढण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे तसेच अमरावती शहर अध्यक्ष नंदकिशोर नवरे यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular