Transparent performance, commitment to honest leadership
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक १७ (अ-गट, अनुसूचित जाती) राखीव गटातून पियुष दयावंती यशवंत धुपे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. स्वच्छ प्रतिमा, तरुण नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. Transparent performance, commitment to honest leadership
“आपला प्रभाग – आपला विकास” हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या धुपे यांनी प्रचारादरम्यान पारदर्शक प्रशासन, प्रामाणिक कामगिरी आणि थेट जनसंपर्कावर भर दिला आहे. “प्रामाणिक सेवा हाच माझे धर्म” तसेच “पारदर्शक कामगिरी, प्रामाणिक नेतृत्व” या ठळक घोषवाक्यांमधून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Chandrapur Municipal Corporation Election 2026
प्रभागातील रस्ते, नाली व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण, तसेच मूलभूत नागरी सुविधा या विषयांवर ठोस कृती आराखडा राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला प्राधान्य देत, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. Piyush Dhupe enters the election fray
ग्रामीण भागाशी नाळ जपणारी विचारसरणी आणि शहरातील वॉर्डचा सर्वांगीण विकास हे त्यांचे प्रमुख ध्येय असून, “माझे एकच ध्येय – जनतेचा आणि वॉर्डचा विकास” असे ते सातत्याने अधोरेखित करीत आहेत. प्रत्येक पाईचा योग्य वापर, पारदर्शक निधी वितरण आणि कामांच्या गुणवत्तेवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. “मित्रांनो, तुम्हीच माझी खरी ताकद आहात. तुमचा आशीर्वादच माझे खरे बळ आहे. या बळावरच प्रभागाच्या प्रगतीचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेऊ,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, दिनांक १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हासमोर बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये परिवर्तनाची नवी व्याख्या लिहिण्याचा निर्धार घुपे यांनी व्यक्त केला असून, ही निवडणूक विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी ठरणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
एकूणच, प्रभाग १७ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत चालली असून, पियुष दयावंती यशवंत धुपे यांची उमेदवारी चंद्रपूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
