Wednesday, May 13, 2026
HomeCultural‘ते पन्नास दिवस’ कादंबरीवर रविवारी चर्चा आणि प्रकट मुलाखत

‘ते पन्नास दिवस’ कादंबरीवर रविवारी चर्चा आणि प्रकट मुलाखत

Discussion and Public Interview on the Novel ‘Te Pannas Divas’ in Chandrapur on Sunday

चंद्रपूर :- कोरोना काळात स्थलांतरित मजुरांच्या वेदना, उपासमार, असुरक्षितता आणि व्यवस्थेच्या संवेदनाहीन चेहऱ्यावर थेट भाष्य करणाऱ्या लेखक पवन भगत यांच्या बहुचर्चित ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीवर फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा तसेच प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी, १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका, चंद्रपूर येथे होणार आहे. पुणे येथील मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी कारंडे या कादंबरीवर भाष्य करणार आहेत. Discussion and Public Interview on the Novel ‘Te Pannas Divas’

विशेष अतिथी म्हणून मनपा नगरसेवक नंदू नागरकर उपस्थित राहतील. संवादक म्हणून अविनाश पोईनकर हे लेखक पवन भगत यांची मुलाखत घेणार आहेत.

मुंबई विद्यापीठ आणि अहमदनगर येथील स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या या कादंबरीचा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला होता. मात्र, ही कादंबरी सरकारविरोधी असल्याचे कारण देत अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ती पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. कन्नड आणि इंग्रजी भाषेतही या कादंबरीचा अनुवाद झाला आहे. लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढणारा दबाव, साहित्याची सामाजिक जबाबदारी आणि मानवी वेदनांचे वास्तव या विषयांवर थेट संवाद घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि स्तंभ पब्लिशिंग हाऊसतर्फे करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular