Friday, September 18, 2026
HomeMaharashtraमुक्तिसंग्राम दिन भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक - हंसराज अहीर

मुक्तिसंग्राम दिन भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक – हंसराज अहीर

चंद्रपूर : निजामांच्या जुलमी सत्तेतून मुक्ती मिळालेला आजचा हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन असूनआम्हा सर्वांसाठी हा दिवस एक मोठा महोत्सव आहे. भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा जन्मदिवसही आज आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल व नरेंद्र मोदी जी यांचे राष्ट्रोध्दारात मोठे योगदान असून त्यांचे देशसेवेचे हे कार्य समस्त देशवासियांकरिता सदैव प्रेरणा देत राहील. मुक्तिसंग्राम दिनाचा हा सोहळा वर्तमान व भावी पिढ्यांसाठी निरंतर दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले. Marathavada Liberation Struggle Day serves as a guiding light for future generations

          राजुरा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून दि. 17  सप्टेंबर 2026  रोजीराजुरा, जिवती व कोरपना येथे हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री राजुराचे माजी आमदारद्वय सुदर्शन निमकरअॅड. संजय धोटेनगराध्यक्ष निलेश ताजणेअरूण मस्कीराजु घरोटेशिवाजी सेलोकररामा मोरेसतिश धोटेअॅड. प्रशांत घरोटेबाळनाथ वडस्करसंजय पावडेविजयराव बावणेमहादेव तपासेलखन अडबालेकिशोर बावणेआबिद अलीचिताडेताईवर्षाताई लांडगेजयाताई धारणकरसुरेखाताई मुकेआशाताई पढोळेलक्ष्मीताई कुळमेथेयेरेकरताईवाघुजी गेडामसुरेश केंद्रेकेशव गिरमाजीमहादेव जयस्वालराजेश राठोडगोपीनाथ चव्हाणनारायण हिवरकरसतिश उपलेंचवारकवडू जरीलेविशाल गज्जलवारवसंत बहीरेशशीकांत आडकीनेप्रमोद कोडापेअरूण मडावीपुरूषोत्तम भोंगळेसतिश बेतावारराहुल सुर्यवंशीतिरूपती कन्नाकेपुनम तिवारीगौतम यादवअमोल आसेकरअनिल कौरासे यांचेसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

          आपल्या भाषणात हंसराज अहीर म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत देशाचा सर्वच क्षेत्रात अभुतपूर्व विकास झाला आहे. त्यांच्या राष्ट्रोध्दारक कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीतअहीर यांनी प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाच्या वतीने आयोजित सेवा  संकल्प अभियान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.

          मागील अनेक वर्षांपासून जिवती तालुक्यातील शेतजमिनीवसाहती वनक्षेत्राच्या कचाट्यात सापडल्या होत्यापरिणामी या तालुक्यातील विकास कार्य खुंटल्या गेले. नागरिकशेतकरी विकासाच्या सोयीसुविधांपासून दूरावला गेला होता. राज्य सरकारने हा अन्याय दूर करीत हजारो हेक्टर जमिनी वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतल्याने याकरिता केलेल्या प्रयत्नांना यश लाभले ही बाब अतिव समाधान देणारी आहे. अजूनही अनेक समस्या आहेतत्या सोडविण्यासाठी आपण कसोशिने प्रयत्न करणार आहे असेही अहीर यांनी यावेळी सांगितले.

          पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशातील लोकांना संविधानिक तत्वांचा अवलंब करीत न्याय दिला आहे. शिक्षण असो की आरोग्यशेती असो की उद्योगदेशांतर्गत सुरक्षा असो की राष्ट्राची सुरक्षा अशा प्रत्येक बाबतीत त्यांनी देश वासियांचा स्वाभिमान जागवला आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. एवढे महान नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपणास लाभले हे या देशाचे अहोभाग्यच आहे.

          मोदीजींनी शेकडो योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविला. महत्वकांक्षी आयुष्यमान भारत योजनाहर घर जल योजनाआवास योजनांनी देश घडविला आहे. दुर्धर आजाराच्या औषधांचे मुल्य कमी करूनकरोडो लोकांना न्याय दिलाजीएसटी कपात करून सर्व घटकांना दिलासा दिला ही प्रधानमंत्र्यांची महानता आहे असेही ते म्हणाले.

          यावेळी नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सेवा संकल्प अभियानाचे औचित साधून राजुराकोरपना व जिवतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे व लाडूचे वितरण करण्यात आले. राजुरा व कोरपना येथील सफाई कामगारांचाही सन्मान करण्यात आला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular