Thursday, July 9, 2026
HomeEmploymentतरुणांसाठी सुवर्णसंधी; पंतप्रधान इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू

तरुणांसाठी सुवर्णसंधी; पंतप्रधान इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू

Appeal to avail the benefits of the Prime Minister’s Internship Scheme

• पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर :- पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी pminternship.mca.gov.in. या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Prime Minister’s Internship Scheme

योजनेअंतर्गत देशातील अग्रगण्य 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असून चंद्रपूर जिल्हासाठी 12 वी/डिप्लोमा/पदवी उमेदवाराकरीता विविध आस्थापनांमध्ये 36 जागा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 जुलै 2026 पर्यन्त आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी प्रति महिना 9 हजार रूपये देण्यात येणार आहे व इंटर्नशिपचा कालावधी 6 किंवा 9 महिने आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थी साठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असून पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले रोजगार इच्छुक तरुणांसाठी ही संधी आहे.

चंद्रपूर जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular