Kunal Pendorkar appointed as District President of Unorganized Workers’ and Employees’ Congress
गडचिरोली :- काँग्रेस पक्षप्रणीत असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी कुणाल पेंदोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे.
आज काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आ.विजय वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते कुणाल पेंदोरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, राकेश नागरे, घनश्याम वाढई,कमलेश खोब्रागडे, तौफिक शेख, जावेद शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
पेंदोरकर यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय आ.विजय वडेट्टीवार, खा.डॉ.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी नगराध्यक्ष अॅड.राम मेश्राम यांना दिले आहे.
पेंदोरकर यांनी यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, नगर परिषद व अन्य कार्यालयांमध्ये कार्यरत कामगार व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला असून, यापुढेही त्यांच्या हक्कांसाठी आपला लढा सुरुच राहील, अशी ग्वाही दिली.
 
                                    


