Thursday, October 30, 2025
HomeAccidentपूल बांधणाऱ्या कंत्राटदारासह, अभियंत्यावर गुन्हे दाखल करा

पूल बांधणाऱ्या कंत्राटदारासह, अभियंत्यावर गुन्हे दाखल करा

File a case against the contractor and the engineer involved in building the bridge over the Zarpat river

चंद्रपूर :- शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपट नदीवर मागील दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता, मात्र अगदी दोन वर्षातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या, दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्ताकडे MNS मनसेच्या जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अन्यथा हा धोकादायक पूल खचून अपघात होण्याची शकता आहे असे नमूद केले होते, मात्र तरीही मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र हा पूल मनसे च्या मागणी मंतर दहा दिवसातच कोसळला. File a case against the contractor and the engineer

त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल मंजूर करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून मनपा आयुक्त यांना दिला आहे. Piyush Dhupe, city president of MNS Public Welfare Cell

यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे कडून दिनांक २८ ऑगस्ट ला मनपा आयुक्त यांना निवेदन देउन लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने हनुमान खिडकी जवळील झरपट नदीवरील पूल खचला तो बांधणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकां अशी मागणी सुद्धा मनसेने निवेदनातून केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular