Momentum Gathers for Loan Waiver Scheme: Details of 43,816 Eligible Farmers Uploaded to Portal
चंद्रपूर :- आजही शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका या क्षेत्राला बसत आहे. अनियमित पाऊस, पूर, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ हे निसर्गाचे चक्र सुरूच असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व पीक कर्जाची थकीत रक्कम माफ करून खरीप हंगामात पुन्हा पीक कर्ज मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना – 2026’ जाहीर केली आहे. Punyashlok Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme – 2026 या योजनेचा लाभ मिळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) 43 हजार 816 पात्र शेतक-यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर यांनी सांगितले. Momentum gathers for the farm loan waiver scheme
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले एक किंवा अनेक बँकांचे अल्पमुदत पीक कर्ज, 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाच्या रकमेसाठी शासनाच्या वतीने 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तसेच 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्यास वरील रक्कम संबंधित शेतक-यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत जमा केल्यास उर्वरीत 2 लाख रुपये कर्जमाफीची रक्कम राज्य सरकार बँकेत जमा करणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. बाळुभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ भव्य मॅरेथॉन स्पर्धा…….
कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात आहे. या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 43862 खातेदारांपैकी 43816 पात्र खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरीत 46 जणांमध्ये 10 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण नसून 36 जणांच्या माहितीमध्ये तांत्रिक अडचण आहे.
अशी आहे अपलोड झालेल्या तालुकानिहाय पात्र खातेदारांची संख्या चंद्रपूर तालुका 1122 (पोर्टलवर अपलोड 1122), सिंदेवाही 2410 (अपलोड 2405), राजुरा 3014 (अपलोड 3014), नागभीड 3859 (अपलोड 3851), भद्रावती 2093 (अपलोड 2092), ब्रम्हपुरी 4672 (अपलोड 4670), चिमूर 5452 (अपलोड 5451), पोंभुर्णा 2189 (अपलोड 2187), मूल 2033 (अपलोड 2033), वरोरा 4084 (अपलोड 4076), कोरपना 5671 (अपलोड 5663), सावली 2802 (अपलोड 2794), गोंडपिपरी 3894 (अपलोड 3891) आणि बल्लारपूर तालुका 567 (अपलोड 567).
शेतकऱ्यांसाठी आवाहन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल.