Sunday, April 19, 2026
HomePoliticalनिराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा

निराधारांच्या योजनेचे थकीत हप्ते खात्यात जमा करा

Deposit the outstanding installments of the scheme for the homeless into the account

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून आधारभूत आर्थिक मदतीस पात्र आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे वेळेवर सादर केले असूनही अद्याप हप्त्यांच्या रक्कमा खात्यावर जमा झालेले नाहीत. ही अत्यंत खेदजनक व अन्यायकारक बाब आहे. तेव्हा आपण विशेष लक्ष देऊन वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

यावेळी ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अंकुश परेकर अंकुश मस्की यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular