Friday, October 31, 2025
HomePoliticalकार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार, काँग्रेसची बैठक उत्साहात

कार्यकर्तांचा एकजुटीचा निर्धार, काँग्रेसची बैठक उत्साहात

Workers’ determination to unite, Congress meeting in high spirits

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील नांदा येथे नांदा सर्कल काँग्रेसची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर संघर्षाचा संकल्प व्यक्त केला. Nanda Circle Congress meeting in high spirits

बैठकीत संघटन मजबूत करण्याबरोबरच परिसरातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून पुढील काळात काँग्रेसचा झेंडा आणखी उंचावण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीस कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्यासह सेवा सहकारी संस्थेचे संचालक भाऊराव चव्हाण, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सुरेश राऊत, महादेव गिरडकर, मनोहर काटे, नथ्थु तलांडे, सुरेश धोटे, मनीष लोढे, शेषराव निवळकर, हारून सिद्धिकी, शिवाजी सातपुते, नंदू भोयर आणि वसंता निसटते, अविनाश काटे, सुरेश राऊत, राजू काळे, मनीष राऊत, हेमत भोयर, मारोती गुडे, मनोज हस्तक यांसारखे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular