Friday, October 31, 2025
HomeEducationalशाळा प्रवेशोत्सवाने चिंचाळा शाळा गजबजली!

शाळा प्रवेशोत्सवाने चिंचाळा शाळा गजबजली!

MLA Sudhakar Adbale’s specially decorated car became an attraction to welcome the children.

चंद्रपूर :- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिंचाळा येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानद्वार उघडणाऱ्या या मंगलप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी विद्यार्थ्यांसाठी खास पाठवलेली सजवलेली कार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या आकर्षक वाहनातून लहानग्यांना शाळेपर्यंत आणून दिल्याने वातावरण भारावून गेले होते.

सकाळी ८ वाजता शाळा प्रवेश दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या दिंडीने गावात एक वेगळीच शैक्षणिक चळवळ निर्माण केली. दिंडीनंतर सकाळी ९ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. Chinchala School was buzzing with the school entrance ceremony

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. सुधाकर अडबाले (विधान परिषद सदस्य, नागपूर शिक्षक मतदारसंघ) होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकं आणि बूट-सॉक्स वाटप करण्यात आले.

विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मीना साळुंखे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे, सरपंच शोभाताई चिमुरकर, मुख्याध्यापक नामदेव आस्वले, केंद्रप्रमुख श्रीमती फुलझेले, ग्राम. सदस्य प्रकाश शेंडे, माजी आदर्श शिक्षक दुर्योधन सर, बाबाराव माशिरकर, सचिव ग्राम. सुधाकर वासेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जुनघरी, पोलिस पाटील प्रवीण बोडेकर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, शाळेच्या प्रती प्रेम निर्माण व्हावे आणि शिक्षणाचा पहिला दिवस आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने आयोजकांनी सुंदर कार्यक्रम राबवला, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी कौतुक केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular