“A capable leader ready for the development of the ward!”
चंद्रपूर :- बाबूपेठ प्रभाग महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (ड) मधून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) कडून राजू रमेश रामटेके यांनी नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. ‘प्रभागाच्या मागावर आमचं सक्षम नेतृत्व!’ या ठाम संकल्पनेसह त्यांनी जनतेसमोर विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला आहे.
समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अपेक्षा आणि अडचणी केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार उमेदवार राजू रामटेके यांनी व्यक्त केला आहे. “जनतेच्या अपेक्षांचा मान राखत, सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन देत, नागरिकांच्या थेट सहभागातून विकास घडवून आणण्यावर त्यांचा भर आहे. बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या BRSP च्या विचारधारेला बळ देण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. Raju Ramteke candidature in Ward No. 13
निवडणूक चिन्ह ‘शिटी’ घेऊन रिंगणात उतरलेले राजू रमेश रामटेके हे प्रभागातील ओळखीचे नाव असून, त्यांची उमेदवारी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, पारदर्शक व जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.