Saturday, January 24, 2026
HomeAcb Trapबायपास मार्गावर कारची दुचाकी, स्कुल बसला धडक

बायपास मार्गावर कारची दुचाकी, स्कुल बसला धडक

Bike rider killed in car collision
Incident on Bypass Road in Chandrapur

चंद्रपूर :- चंद्रपुरातील बल्लारपूर बायपास मार्गावर आज दिनांक 2 फेबु्रवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहना ने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून घटनास्थळावरून कार चालक पसार झाला. Terrible accident

दुचाकी वाहन क्रमांक एम.एच. 34 यु 6197 हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते. त्याचवेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते. मात्र कार क्र.एम.एच.34 बी.एफ. 7393 च्या चालकाने वाहन विरूध्द दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या कारने आधी मार्गावर उभ्या असलेल्या स्कुल बस क्र.एम.एच. 34 बी.झेड. 1905 ला धडक दिली, त्यांनतर अनियंत्रित कारने दुचाकीला जबर धडक दिली. धडकी इतकी जबर होती की दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडला असून त्याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. Bike rider killed in car collision

सदर घटनास्थळावरून कार चालक हा पसार झाला असून मृतकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.

सदर घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला.

सदर घटेनेचा तपास रामनगर पोलिस करीत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular